बाप
बाप
बिडी ओढत ओढत
धुर सोडीत आला
बाप माझा शेतकरी
कर्जबाजारी झाला
थरथरत्या ओठाने
पैसा मोजू लागला
परतफेड करण्याची
जणू धसकीच त्याला
चिंचेच्या झाडाखाली
विचार करताना
सावकाराचा निरोप
गड्याहाती आला
कष्टाच फळ घेऊन
चालता झाला
होता तेवढा पैसा
व्याजामध्येच गेला
असा माझा शेतकरी बाप
कर्जबाजारी झाला, कर्जबाजारी झाला.....