STORYMIRROR

Mahadev Hoge

Inspirational

3  

Mahadev Hoge

Inspirational

आयुष्य

आयुष्य

1 min
141

नैराश्याचा वाटेकरी 

गाव गावचा शेतकरी

बाता मारी चावडीवरी

औषध फवारणीच्या

अन लाल्या करप्याच्या


नैराश्याचा वाटेकरी 

गाव गावचा शेतकरी 

लक्ष ठेवी पिकावरी 

कॉटण कपाशीच्या


नैराश्याचा वाटेकरी 

गाव गावचा शेतकरी 

मुले शिकवी शाळेवरी 

मराठी अन इंग्रजीच्या


नैराश्याचा वाटेकरी 

गाव गावचा शेतकरी 

पैसा घेतो व्याजावरी 

सावकाराकडून ओळखीच्या


नैराश्याचा वाटेकरी

गाव गावचा शेतकरी 

हाती आलेले पीक जाई

तेव्हा फाशी झाडावरी घेई


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Mahadev Hoge

बाप

बाप

1 min वाचा

आई

आई

1 min वाचा

भाऊ

भाऊ

1 min वाचा

ताई

ताई

1 min वाचा

Similar marathi poem from Inspirational