STORYMIRROR

Mahadev Hoge

Others

4  

Mahadev Hoge

Others

भाऊ

भाऊ

1 min
306

आम्ही दोघे सख्खे भाऊ

एका घरची भाकर खाऊ

काम धाम करता करता

दुजाभाव विसरून जाऊ


आम्ही दोघे सख्खे भाऊ 

चुलतीच्या घरी डोकावुन पाहू 

क्षणात तिच्या तोंडून 

दोन चार शिव्या खाऊ


आम्ही दोघे सख्खे भाऊ

भावकीसोबत एकजुटीने राहू 

फिरता फिरता गावामध्ये 

जय जिजाऊ घालीत जाऊ


आम्ही दोघे सख्खे भाऊ 

नातलगांना साथ देऊ 

जाता जाता त्यांच्या घरी

शिदोरीचे लाडू नेऊ


आम्ही दोघे सख्खे भाऊ

क्षणोक्षणी आनंदाने राहू 

वैरीपणाचे विचार सोडून 

चांगले काही करीत जाऊ


Rate this content
Log in

More marathi poem from Mahadev Hoge