ताई
ताई
1 min
252
येऊन बऱ्याच वेळी
ताई माझी जिव लावी
जाड मनगटी गादी शोची
उजव्या हाती बांधत जाई
पंचारती ओवाळताना
डोळ्यात माझ्या निरखुन पाही
दुःख आश्रु रिमझिमताना
मनात माझ्या बिलगुन जाई
खडी-साखराचे चार खडे
बहीण माझ्या हातावर देई
खाताना चगळू चगळू
बालपणीची आठवन येई
रात्रभर सांगताना बाललीला
खुदकन हासू गालावर येई
पौर्णीमेच्या चांदरातीला
बरेच काही बोलून जाई
सासरवाडीहून नवऱ्याचा निरोप
हातो परहाती कानावर येताच
निरोप आमुचा घेऊन
बहीण माझी चालती होई
