STORYMIRROR

Mahadev Hoge

Others

4  

Mahadev Hoge

Others

आई

आई

1 min
374

कणा कणात मातीच्या

कष्ट ओकनारी बाई

पाना पानात हिरवळीच्या 

फुले तोडायाची काही


घाई घाईत कामाच्या 

भुक लागनारी बाई 

पेऱ्या पेऱ्यात धानाच्या 

वाळकाचे मिडूक पाही


घरा दारात मातीच्या 

चूल पेटवणारी बाई

सणासुदीला नेहमी

सेनाच्या भोईसया घेई


क्षणा क्षणाला पाळना

हलवणारी बाई 

लहाण मोठे मुंजे घालून 

साखरभात हातावर देई


शेत शिवारात गंगथडीच्या

विऱ्हा खननारी बाई

मना मनात माझ्या 

सतत भिनत राही

ती म्हणजे माझी आई माझी आई माझी आई ....


Rate this content
Log in

More marathi poem from Mahadev Hoge