STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

2  

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

बाप म्हणजे

बाप म्हणजे

1 min
80

नारळाची जात असतो बाप म्हणजे

कापसाची वात असतो बाप म्हणजे

झेलतो मोठी तुफाने काळजावर

वादळांची रात असतो बाप म्हणजे

अंतरीची ज्योत आहे जन्मदाता

देव तो साक्षात असतो बाप म्हणजे

बोलला नाही कधीही दुःख त्याचे

वेगळ्या कोड्यात असतो बाप म्हणजे

भेदते पाणी पहाडाच्या तळाला

निर्झरा दगडात असतो बाप म्हणजे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy