बाबा
बाबा
दमलेल्या बाबाची ऐकली सगळ्यांनी कहाणी
पण खरं तर बाबाला कधी दमून चालतच नाही
मुलाच्या जन्माने तो बाबा होतो आणि
अखंड कष्टाचे ओझे डोक्यावर घेतो
शाळांच्या फियांचे ओझे, हौसेमौजेचे ओझे
ट्रीप ट्रेक ची किंमत, नवीन वस्तू ची किंमत
बाबा मोजतच असतो, तरीही दमत नसतो
मुले बरोबरीला येतात, पगार कमवायला लागतात
बाबाच्या पगारापेक्षा २/३ शुन्य अधिक कमावतात
वय झालेल्या बाबाचे शिल्लक मोजणे चालू होते
कारण एवढ्या वर्षा मधे त्याचे काहीच शिल्लक नसते
परत एकदा बाबा न दमता उभा राहतो कारण
त्याला माहिती असतं, बाबाला कधी दमून चालतच नसतं