STORYMIRROR

Vrushali Kulkarni

Others

3  

Vrushali Kulkarni

Others

अभागी

अभागी

1 min
225

सोसणाऱ्याने सोसायचे असते 

मरणार्याने मारायचेच असते 

सोसणाऱ्याने कारण कधीच विचारायचे नसते 

सोसणाऱ्या सुतपुत्राचे फक्त चिंतन करायचे असते 

जगात असणाऱ्या पांडवांनी कधी अवहेलना करायची असते 

सोसणाऱ्या कर्णाने ती फुले म्हणून झेलायची असते 

परिस्थिती असणाऱ्या द्रौपदीने पदोपदी अपमान करायचा असतो 

सोसणाऱ्या राधेयाने स्त्रीदाक्षिण्य म्हणून सोडून द्यायचे असते 

स्वतःच्याच मुलात कुंतिने दुजाभाव करायचा असतो 

सोसणाऱ्या कौंतेयाने दातृत्वाने मोठेपणा दाखवायचा असतो 

सोसणाऱ्याने कधी एकही चूक करायची नसते 

अवहेलणाऱ्या तथाकथित पांडवांना 

परिस्थिती ने मग्रूर झालेल्या द्रौपदी ला 

जन्म देणाऱ्या स्वार्थी मातेला 

कधीही दूषणे द्यायची नसतात 

    कारण 

सोसणारा कधीही मारत नसतो 

आणि मारणारा कधी सोसत नसतो


Rate this content
Log in