पायवाट
पायवाट
याल माझ्या बरोबर कोणी?
द्याल मला सोबत कोणी?
मी जाणार आहे एका मखमली पायवाटेवरून
त्या पायवाटेवर घातल्याआहेत आकाशाने पायघड्या
सगळ्या विकारांनी तेथील मारल्या आहेत दड्या
तिथे दुःखाचा ना मुळी लवलेश
ना सुखाचा अतिरेक
तिथे करत नाही कोणी भावनांची कदर
कारण तिथे भावनांना स्थानच नसते कोणाजवळ
तिथे दुःख ना सुख
मग आपण स्वतःच होतो अंतर्मुख
व्हाल तुम्ही असे? याल मी नेईन तिथे?
पण नकोच, ही वाट माझ्या एकटीची आहे
आणि मी एकटीच जाणार आहे तिच्यावरून
एकटी अगदी एकटी...
