बाबा
बाबा
बाबा असतो वडासारखा
मातीत घट्ट रूतूून कुंटूंबाला सावली देणारा
स्वतः ऊन सोसणारा
पण लेकरांंच्या पंखात बळ देणारा
कधी माय होवून झुला झुुुुलविणारा
तर कधी स्वतःच्या वहाणा
लेेकराला देणारा
कुुंटूंबाचे छत्र होवूूून
मायेेची सावली धरणारा
प्रत्येक संकटाला सामोर जाणारा
मुुुुलांच्या हाकेला धावून येेेेणारा
कुुंटूंबाला आधार देणारा
आयुष्यभर पिलांसाठी तग धरून
विस्तवावर चालणारा
आयुष्यभर नात्याला सिंचन देणारा
कधी घराची कौले तर कधी घराची भिंत बांधणारा
प्रत्येकाच्या मनामध्ये ज्यांंचा त्यांचा बाबा
दडलेला असतो......
मनाच्या कप्पामध्येे ज्याने त्याने
लपवलेला असतो......!!
