अविस्मरणीय क्षण
अविस्मरणीय क्षण
जीवनात क्षण येती जाती
सुख दुःख साथ साथ संगती
असे अविस्मरणीय क्षण माझ्या
कायम मनात घर करुनी राहती.
आठवतो तो क्षण सौख्याचा
बोर्डातला पहिला नंबर मुलीचा
कौतुकाचा वर्षाव केला होता
सहकारी शिक्षकांनी दोघींचा.
माझ्याच शाळेत शिकणारी लेक
आज ताईत बनली होती सर्वांची
अभिमानाने फुलली होती छाती
धन्यता मिळाली होती जीवनाची.
फारच विरळ असे अशा घटना
आपण शिकवतो तेथे त्या शाळेत
आपल्या मुलांना शिकवणे जमेना
पण मी नव्हते बसत त्या माळेत.
मी आणि माझ्या मुलीने केले सिद्ध
तिची जिद्द,चिकाटी,अभ्यासू वृत्ती
यश शिखर ती जिंकली सहजतेने
प्रत्यक्ष दाखवुनी दिली स्वतःची कृती.
मुंबईच्या के वॉर्डमध्ये पहिला नंबर
वर्षाव कौतुकाचा तो माय लेकीवर
यश ध्वज फडकवला माय - लेकीने
अभिमानाची गोष्ट जाहली शिक्षिकेवर.
