STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Abstract

3  

Mrs. Mangla Borkar

Abstract

** अस्तित्व **

** अस्तित्व **

1 min
189

स्वतःच अस्तित्व शोधताना


 मी कुठेतरी हरवुन जाते!!


 समाज, रुढी, परंपरा यात आता


 पुरती मी बुडून जाते!!


 कोणाला मी हवीये


 तर कोणासाठी बोज होऊन जाते!!


 एक स्त्री म्हणून जगताना


 आज खरंच मी स्वतःस पहाते!!


 माझेच मीपण सोडुन मी


 तुझे पुरुषत्व जपत राहते!!


 कधी खंत मनाची तर


 कधी स्वतःस सावरून जाते!!


 कधी घोटला गळा माझा


 पोटातच मला मारले जाते!!


 कधी समाज लाजेचे रोज


 कितीतरी बलात्कार होत राहते!!


 तरीही धडपड माझी आज


 तुझ्यासवे मी चालत जाते!!


 स्त्री म्हणुन जगताना मी


 नेहमीच तुझी साथ देत राहते!!


 स्वतःच अस्तित्व शोधताना


 खरंच मी हरवुन जाते..!!"


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract