STORYMIRROR

Raakesh More

Romance

4  

Raakesh More

Romance

असं कधी वाटलं नव्हतं

असं कधी वाटलं नव्हतं

1 min
439

हृदयात तुझ्यासाठी कधीही

प्रेम असं दाटलं नव्हतं

इतका अधीर होईन तुझ्यासाठी

असं कधी वाटलं नव्हतं||0||


मनमोकळेपणाने तुझ्याशी

सर्वकाही बोलत होतो

मनातली गुपितं नि:संकोच

तुझ्यासमोर खोलत होतो

मैत्रीचं निखळ नातं आपलं

असं कधी आटलं नव्हतं

इतका अधीर होईन तुझ्यासाठी

असं कधी वाटलं नव्हतं||1||


प्रेमाच्या नजरेनं कधीच तुला

मी तरी पाहिलं नव्हतं

मनात तुझ्याबद्दल कधीही

शिल्लक काही राहिलं नव्हतं

हृदयात प्रेमाचं मंदिर सखे

अजून तरी थाटलं नव्हतं

इतका अधीर होईन तुझ्यासाठी

असं कधी वाटलं नव्हतं||2||


का कोणत्या वळणावर कसं

माझं हृदय कोलमडलं

मलाच कळलं नाही अचानक

क्षणात तुझ्या प्रेमात पडलं

आजपर्यंत प्रेमाचं कधी

शिखर मी गाठलं नव्हतं

इतका अधीर होईन तुझ्यासाठी

असं कधी वाटलं नव्हतं||3||


प्रेमात तुझ्या आकंठ बुडालो

कधी ते आठवत नाही

हृदय तुझ्या आठवणी काही

केल्या परत पाठवत नाही

प्रेमावर मात करण्याचं मी

श्रेय कधी लाटलं नव्हतं

इतका अधीर होईन तुझ्यासाठी

असं कधी वाटलं नव्हतं||4||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance