Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rakesh More

Romance

3  

Rakesh More

Romance

अशीच एकदा ये आणि

अशीच एकदा ये आणि

1 min
149


अशीच एकदा ये 

आणि चक्कर मारून जा 

जाता जाता मुद्दामहून 

हृदय हरून जा || 0 ||


काय हवंय मला 

तूला तर कळत आहे 

तुझ्याशिवाय माझं 

मन इथे जळत आहे 

जे मला हवं आहे 

ते तू करुन जा 

जाता जाता मुद्दामहून 

हृदय हरून जा || 1 ||


हृदय रिकामं तुझ्याशिवाय 

रितं रितं वाटतं 

या रितेपणातही 

प्रेम तुझं साठतं 

मनात तुझ्या माझी 

प्रीत भरून जा 

जाता जाता मुद्दामहून 

हृदय हरून जा || 2 ||


उचंबळून येतात भावना 

पूर येत आहे 

पूर हा मला आत 

खेचून घेत आहे 

भरती बनून प्रेमाची ये 

आणि ओसरून जा 

जाता जाता मुद्दामहून 

हृदय हरून जा || 3 ||


तुझ्यासाठी तडफडणं 

तुझा विचार करणं 

तुझ्यासाठी जगणं आणि 

तुझ्यासाठी मरणं 

मुठीत माझं तू 

हृदय धरून जा 

जाता जाता मुद्दामहून 

हृदय हरून जा || 4 ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance