अशीच एक संध्याकाळ
अशीच एक संध्याकाळ
अशीच एक संध्याकाळ
साक्ष होती तुुुुझ्या माझ्या
प्रेमाची त्या मिलनाची
भावना उफाळूून आलेल्या
त्या सुखद गोड क्षणांची
अशीच एक संध्याकाळ
माझ्या मनात दाटलेली
परकी असूनही जेेव्हा
तु आपलीशी वाटलेली.....
अशीच एक संध्याकाळ
काहुरलेली, नभात साचलेली
संंधी प्रकाशात मला ती
जेव्हा कातरवेळी भासलेेेली.....
अशीच एक संध्याकाळ
साक्ष होती माझ्या दुुःखाची
सागराच्या लाटेप्रमाणे
उसळलेल्या माझ्या आसवांची.....

