STORYMIRROR

Pallavi Udhoji

Romance

3  

Pallavi Udhoji

Romance

असा कसा रे तू

असा कसा रे तू

1 min
290

असा कसा खुळा रे तू

एवढंही तुला कळत नाही

खुळं मन हे माझं

तुझाच शोध घेत राही


असा कसा रे बावरा तू

समजत तुला काही नाही

बावरे मन माझे

करमत तुझ्याविणा नाही


असा कसा रे येडा तू

उमगत तुला नाही

तुझ्याशिवाय वेडं मन माझं

कोणाचाही विचार करत नाही


असा कसा रे तू खुळा

बावरं मन माझं खुळं मन माझं

प्रेम तुझ्यावर इतकी करते की

नजर माझी तुझाच शोध घेते 

खरंच प्रेम तुझ्यावर मी अफाट करते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance