STORYMIRROR

Sarika Jinturkar

Romance

4  

Sarika Jinturkar

Romance

अपेक्षा

अपेक्षा

1 min
299

अजुनी अपेक्षा आहे 

कधीतरी तू मला या 

पावसात पुन्हा एकदा 

अचानक भेटशील  

रिमझिम पावसाच्या सरी बरसतांना, दिसता अचानक मी लपून मला पाहशील 

बोलाव की नाही या विचारात मला टाळशील अन् मग मात्र हजारो विचारांचा डोंगर तू चढशील 


ते अबोल शब्द तो धुंद सहवास समजून घेशील

 तुझ्या प्रत्येक गोष्टीत फक्त माझाच आभास करशील आठवूण क्षण सगळे हळूच गालात हसशील 

 

सगळ दुःख मनात ठेवून जगासमोर खूप हसशील

 कधीतरी घेऊन नाव माझे एकांतात जाऊन रडशील  


काळोख्या रात्री त्या चांदण्या जेव्हा पाहशील पाहतांना चांदण्या आठवण माझी काढशील 

आणि त्या चांदण्या मोजण्यात रात्रभर तू जागशील 

डोळे होतील ओलेचिंब माझ्या आठवणीशी तू भांडशील भरलेल्या जगामध्ये आपल कोणी शोधशील रिती दिसेल ओंजळ मग मात्र माझाच विचार करशील  

अजूनही अपेक्षा आहे पडणारा पाऊस अन् गारव्याचा सहवास जसा तू माझी कधीतरी साथ देशील.. 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance