STORYMIRROR

Sarita Kaldhone

Inspirational

3  

Sarita Kaldhone

Inspirational

अंकुर

अंकुर

1 min
349

ग्रीष्मात तापल्या धरेवर

पडताच जलथेंबांचा मोती

नित्यनेमे बळीराजा निभावतो

काळ्या आईशी आपली नाती....


कष्टून,रक्ताचे पाणी शिंपून

राबत असतो बळीराजा

जगा मिळाया पोटभर भाकर

झीजत राही हा राजा....


पेरतो कणकण मातीच्या कुशीत

उगवतो गर्भातून अंकुर

नव्या विश्वसाला मिळे उभारी

आशेचाही मिसळतो सूर...


ऊन वारा झेलत जाई

तरी डौलाने उभाच राही

झुंजून लाख संकटांशी 

स्वप्न भविष्याचे पाही...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational