STORYMIRROR

आ. वि. कामिरे

Abstract Drama

3  

आ. वि. कामिरे

Abstract Drama

अंधार नेहमीच वाईट नसतो

अंधार नेहमीच वाईट नसतो

1 min
344

अंधार नेहमीच वाईट नसतो

समाज त्यास पाहताक्षणी पळ काढतो

अंधाराची सांगू किती महती तुम्हाला

या संपूर्ण विश्वात रडायला नसताना जागा

तेथे हा अंधारच सावरतो आपल्याला

तोच आहे असा माणूस राजा

जो लागल्यावर ठेच, नाही करीत गाजावाजा


सुख असो वा असो दुःख 

आपल्या सुख-दुःखात तोच असतो सदा सहभागी

आणि आपण अभागी

थोडं त्याचं कौतुकसुद्धा करु शकत नाही

सर्व काही डोळ्यांनी दिसत असतानाही

आपण मात्र कधीच कोणासमोर ते उघडत नाही


परंतु जेंव्हा येतो विषय अंधाराचा

तेव्हा त्याविना आपले दुःख कमीही होत नाही

झाली वर्षे इतकी

तरी या मनात समाजाच्या

नाही विचार नेटकी

अंधाराच्या या सुंदर कल्पनेला 

तो दर्शवतो अजूनही नकारात्मकतेला

अंधार हाच मित्र खरा एकट्यांचा

जो असतो सदा सोबत त्यांच्या

सदैव तोंडावर ठेवूनी हसू खोटे

होतात व्यक्त या एकांतात हे एकटे

अशाक्षणी अंधारच आहे जो

सावरतो तयांना पाहुनी त्यांचे मन


अश्या अंधाराला समजू नाही शकले जन

आत्ता सांगा बर तुम्हीच

हा एकट्यांचा तारणहारच

असेल कसा वाईट 

अन् त्यास दूर करण्या का लावता लाईट

खरचं हे आहे विश्व भरलेले दुःखाने 

त्यास घालवण्या घेतला जन्म अंधाराने

म्हणूनच या पापरुपी दुःखी विश्वात 

अंधाराचा चांगुलपणा नेहमीच मला दिसतो

खरचं हा अंधार नेहमीच वाईट नसतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract