अलंकार लक्ष्मी
अलंकार लक्ष्मी
नाकात तुझ्या नथ
घातलीस नऊवारी
असते तु लक्ष्मी घरी
नाजुक ओठांना लाली
कानात भिकबाळी,
माथी बिंदी ...
तुझ्या दर्शनाची रोज मिळावी संधी !!
गोर्या हातात हिरवा चुडा दंडात वाकी
संसाराच्या सुखदुःखाची ठेवते बेरीज वजाबाकी
कटीला शोभते मेखला
पायात पैंजण ..दुःखात सुखाचे घालते विरजण
बोटात जोडवी मासोळी
आणुन देतो तुला चंद्रकला काचोळी
लोभस तुझे रुप जीव झाला वेडा
लावण्यवती तु संसाराची
भरवितो तुला सुखाचा पेढा
मागतो तुला जन्मजन्मांतराची साथ
झाले हळवे मन
राहू देशील ना ग सजणी
तुझा नाजुक हात माझ्या कणखर हातात ॥

