STORYMIRROR

Ashwini - Mishrikotkar

Tragedy

3  

Ashwini - Mishrikotkar

Tragedy

अकल्पित

अकल्पित

1 min
204

निसर्गाची लीला अजब

किमया निराळी असते

कधी देते भरभरून तर

कधी दुःखाची झळाळी देते


आयुष्याची दोरी असते

ज्या शेतीच्या भरवशावर

अकल्पित सारे घडते

या निसर्गाच्या चक्रावर


भार आता सोसवत नाही

कधी अवकाळी तर कधी दुष्काळी

जमीनदोस्त होऊन जाते

हिरवी झालेली यावेळी


निसर्गाचक्रात सापडून

कोलमडतो बळीराजा

अकल्पित बदलाने मात्र

हतबल होतोय राजा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy