STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Romance

4  

Sakharam Aachrekar

Romance

अजून एक गीत

अजून एक गीत

1 min
578

आग्रहाखातर तुझ्या रचितो, अजून एक गीत

सांग कधी होतील श्वास तुझे, माझ्या हृदयीचे मीत


तुझ्या माझ्या अंतराचे गणित, रोज माझे चुकते

तुला समजावण्याची संधी, प्रत्येक भेटीत हुकते


पाहता तुला शब्द मनीचे, आपोआप सूर होतात

अन तू सोबत नसताना, तुझ्याचसाठी गीत गातात


मोकळ्या वेळेत आठवतो मला, तुझा लटका राग

जो ठरतो माझ्या आठवणींच्या, पानावरचा गोड भाग


घाबरतो सांगायला मी तुला, माझं प्रेम पुन्हा पुन्हा

का समजतेस माझ्या प्रेमाला, इतका गंभीर गुन्हा


साक्षीने चंद्र तार्‍यांच्या, पुन्हा तुझा हात मागतो

चार क्षणांच्या आयुष्यासाठी, मी तुझी साथ मागतो


विखुरलेल्या माझ्या हृदयपाकळ्या, सांग कधी जोडशील

अबोल दुरावा आपल्यातला, कोण्या दिवशी तोडशील


त्या दिवशी होईल पूर्ण, माझे तुझ्यावरचे गीत

होतील जेव्हा श्वास तुझे, माझ्या हृदयीचे मीत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance