STORYMIRROR

Jyoti Jaldewar

Classics

2  

Jyoti Jaldewar

Classics

ऐसे नित्यकाळ

ऐसे नित्यकाळ

1 min
13.8K


ऐसे नित्यकाळ जाताती वना ।

गोपाळ रामकृष्ण खेळती खेळ नाना ॥१॥

यमुनेचे तटीं कळंबा तळवटीं ।

मांडियला काला गोपाळांची दाटी ॥२॥

आणिती शिदोर्‍या आपाअपल्या ।

जया जैसा हेत तैशा त्या चांगल्या ॥३॥

शिळ्या विटक्या भाकरी दहीं भात लोणी ।

मिळेवोनी मेळा करी चक्रपाणी ॥४॥

एका जनार्दनीं अवघ्यां देतो कवळ ।

ठकविलें तेणें ब्रह्मादिक सकळ ॥५॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics