अबोला हा सोड गं....
अबोला हा सोड गं....
प्रितीचे हे धागे सखे
प्रेमाने तू जोड गं ।
पुरे झाले रुसणे, फुगणे आता
अबोला हा सोड गं ।।
तळमळतोय मी तुझ्याशी बोलायला
बघायला आणि कवेत घ्यायला ।
ये मज जवळी सखे तू
दुरावा हा नष्ट करायला ।।
गात बसतो मी विरहगीत
तुझ्या गं आठवणीत ।
तू मात्र बसली सखे
तुझ्या घरी गं चैनीत ।।
कळू दे गं सखे साजने
तुला माझ्या अंतरीच्या भावना ।
माफ कर मला सखे गं
तुझे रूप दाव ना ।।
देतोय वचन हा अजय तुला गं
अर्धांगिनी मी तुलाच बनवणार ।
देणार आयुष्यभर साथ सखे
तुला कधीच नाही गं फसवणार ।।

