STORYMIRROR

प्रितफुल प्रित

Inspirational

3  

प्रितफुल प्रित

Inspirational

अभंग

अभंग

1 min
11.8K

अती राग माथी । काय तो कामाचा ।

गढूळली वाचा । अपशब्दें ।।१।।


मिथ्या अहंकार । मनी भरलासी । 

जनां दुखविसी । वेळोवेळी ।।२।। 


चिंतेत बुडसी । सदासर्वकाळ ।

धैर्य देई बळ । तरावया ।।३।।


विंचू संशयाचा । जर का डसला ।

सर्वनाश झाला । संसाराचा ।।४।।


शरीरसुखाचा । नको रे हव्यास ।

धरावी ती कास । विवेकाची ।।५।।


कदापि न द्यावे । लोभा स्थान मनी ।

व्हावे समाधानी । थोडक्यात ।।६।।


मत्सर वाळवी । नात्याशी पोखरी ।

अंत तिचा करी । सौहार्दाने ।।७।।


नको राहू कधी । निराशेत दुःखी ।

जगी सर्वसुखी । कोण आहे ।।८।।


सोडी वैरभाव । जपे मानवता ।

तोचि भगवंता । प्रिय भारी ।।९।।


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ

Similar marathi poem from Inspirational