पराधीन जगण्याचा
पराधीन जगण्याचा
1 min
23.3K
पराधीन जगण्याचा आजार मान्य नाही
हरलेल्या भावनांचा व्यापार मान्य नाही
भले चालते मी संथ कासवाच्या गतीने
अविचारी सश्याची ती हार मान्य नाही
कमळास नसावी तमा चिखलात सडण्याची
गुलाबास काट्यांची बहार मान्य नाही
खंगल्या वाटा डोळ्यांत क्षितिजच लोपले
मनावर आठवांचा प्रहार मान्य नाही
रूप हा शाप नशीबाचा पटवले मनाला
अधाशी नजरांचा या संचार मान्य नाही
कठपुतळी नाचे डोंबा-याच्या तालावरी
उपाशी पोटातला विखार मान्य नाही
कोळून प्यायले मी नियतीच्या शिव्याशापां
श्वासांच्या लिलावाचा विचार मान्य नाही
