STORYMIRROR

प्रितफुल प्रित

Classics

3  

प्रितफुल प्रित

Classics

श्रावणसर

श्रावणसर

1 min
302

श्रावणातली पडून गेलेली पावसाची हलकीशी सर ;

स्वतःचा नित्याचाच लहरी मुड....

त्याच त्या रानातल्या आम्रवृक्षाच्या गुलाबी पालवीवर 

नकळत विसरुन गेलेली....

आणि त्याच त्या निथळत्या फांदीखाली....

त्या सरत्या सरीचे अंश उगाचच अंगावरुन झटकण्याचा

केविलवाणा प्रयत्न करत ;

एकमेकांना खेटून उभे असलेले निथळते तो अन् मी....


हातातल्या जबरदस्ती च्या बंद छत्री चे ओझे हातात मिरवत 

जाणून बुजून तिच्याकडे कानाडोळा केलेले ;

नेहमीचेच खट्याळ तो अन् मी....

एकमेकांचे चोरटे, लाजरे कटाक्ष; 

एकमेकांच्या भिजलेल्या आणि थिजलेल्याही गो-या देहांवर रेंगाळणारे ;

त्यांना कळून सवरुन ही झेलत उभे तो अन् मी....

पायाखालच्या भिजलेल्या लाल मातीची मऊ ढेकळॆ; 

लाल नखांनी उगाचच सतत उकरत.... 

एकमेकांचा ढळता तोल उगाचच सावरत....

कळत नकळत होणा-या जाणिवांचा..

हवाहवासा परिसस्पर्श टाळण्याचा लटका प्रयत्न करत....

लाज-या नयनांची एकमेकातली गुंतवणूक सोडवण्याचा 

अट्टाहास बाजूला ठेवून....

हळुहळू रोमरोमांतला बटमोगरा उमलू लागलेले;

बहरु लागलेले, महकणारे, गंधीत तो अन् मी....


अन् आतापर्यंत पेललेले संयमाचे जड झालेले

पण आता अलगद घसरत चाललेले, भिजलेले परिधान भिरकावून....

त्याचं कोसळणं अन् मी त्याच्यात अलगद मिसळणं.....

"आश्लेषा" सारखे एकमेकांत मुरत गेलेले, तो अन् मी....


प्रितफुल



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics