Read a tale of endurance, will & a daring fight against Covid. Click here for "The Stalwarts" by Soni Shalini.
Read a tale of endurance, will & a daring fight against Covid. Click here for "The Stalwarts" by Soni Shalini.

प्रितफुल प्रित

Others

4.5  

प्रितफुल प्रित

Others

गुलमोहर

गुलमोहर

1 min
178


साऱ्या जगापासून अनभिज्ञ

दूरवर एकटाच उभा,

निसर्गाच्या सजीवत्वाशी 

फारकत घेतल्यासारखा, 

ओसरलेल्या हिरवाईतच 

अस्तित्व शोधणारा

तो एक फुलापानांनी वंचित असा शापित गुलमोहर

पण एक दिवस.......

 कशी कोण जाणे.......

कुठूनशी वाऱ्याची एक मनमौजी झुळूक हलकेच आली दूरवरून त्याच्या दिशेने.....

अन् चमत्कारच झाला म्हणायचा......

अंतिम घटका मोजत असणाऱ्या 

त्या गुलमोहराच्या

प्रेतवत कुडीत ;

त्या अलवार स्पर्शाने एक हलकीशी धुगधुगी आली असावी;..

अन् एक नाजुकसा शहारा त्याच्या निष्पर्ण फांद्यांवर उठला...

जणू काही त्या झुळुकेच्या 

अलवार, आश्वासक मिठीने 

त्याच्या वठल्या रंध्रामध्ये 

शेकडो प्राण फुंकले ....

मग सुकल्या फांदीवर एक 

इवलासा आशेचा अंकुर उगवला....

आणि बघताबघता तो गुलमोहर हिरव्याकंच लुसलुशीत पालवीने बहरत गेला....

त्या वेड्या झुळुकेलाही कशी कोण जाणे त्या गुलमोहराची आता खूपच ओढ लागली होती....

ती येत राहिली;

प्रेमाने कवेत घेत राहिली

त्यालाही तिची आस लागली; 

तिचाच सतत ध्यास लागला....

ओसाड एकाकी जीवाला 

अवचितच साथ लाभली....

आणि अपरिमित आनंदाने तो वेडा गुलमोहर भारावून गेला....

 तिचा सहवास त्याच्या फांद्यांवर अनंत केसरकळ्या उमलवून गेला....

हिरव्याकंच पैठणीवर अगणित केसरफुलांची बुट्टी पेरावी ;

तसा हा गुलमोहर या जादुई प्रेम बहराने फुलून गेला....

अल्पावधीतच या केसरफुलांनी पूर्ण गुलमोहर काबीज केला

आता हा प्रेमवेडा गुलमोहर त्या स्वछंदी झुळूकेच्या निस्वार्थी, निरामय प्रीतीत विहरतोय, बहरतोय....

 असं वाटतंय, अवघा वसंत या गुलमोहरावर एकवटला आहे

आणि हा गुलमोहराचा पुनर्जन्मच दोघांच्या जगण्याला एक वेगळा अर्थ देऊन गेलाय...


Rate this content
Log in