STORYMIRROR

Nitin Borude

Action Inspirational

3  

Nitin Borude

Action Inspirational

आयुष्यचा खेळ

आयुष्यचा खेळ

1 min
283

मित्रा ,हरलास म्हणून रडतोस काय ,

पुन्हा उठून प्रयत्न कर |

कष्टाने मात करून अपयशावरती ,

यशावरती राज्य कर |

देतील लोक आदर्श तुझा ,

त्यांच्या अपेक्षांना पूर्ण कर |

हरलास पुन्हा तरी चालेल ,

अनुभवांमध्ये तुझ्या वाढ कर |

झाला यशस्वी तर मनाचा राजा होशील,

अन आले अपयश तर गुरु होशील ,

पण मित्रा ,हरलास म्हणून रडतोस काय ,

पुन्हा उठून प्रयत्न कर ||


झालीय सुरुवात तुझी अपयशाने ,

यशासाठी कष्टामध्ये वाढ कर |

राहू नको देवाच्या भरवशावराती ,

स्वतःच स्वतःसाठी प्रयत्न कर |

कामविलेय शरीर तुझेच तू ,

वापर त्याचा तुझ्यासाठीच कर |

पण मित्रा ,हरलास म्हणून रडतोस काय,

पुन्हा उठून प्रयत्न कर ‖


शोध तुझ्यातील तू धाडसाला ,

जगण्यासाठी त्याचा वापर कर |

अन आत्मविश्वासाने जगून या दुनियेमध्ये ,

न्यूनगंडास तुझ्या तू दूर कर |

धावत येईल यश तुझ्यामागे ,

अजून थोडे कष्ट कर |

पण मित्रा, हरलास म्हणून रडतोस काय ,

पुन्हा उठून प्रयत्न कर!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action