जगून तरी बघ....
जगून तरी बघ....
जन्माला आला आहेस तर थोडं जगून बघ
जीवन खूप खडतर आहे थोडं सोसून बघ,
चिमुटभर दुःखाने कोसळून जाऊ नकोस
प्रयत्नाचा डोंगर चढून बघ, यशाची चव चाखून बघ,
अपयश आलं तर ते निरखून बघ
यश आलं तर ते थोडं वाटून बघ,
डाव मांडणं खूप सोपं आहे फक्त थोडं खेळून बघ,
स्वतःचं घरटं बांधायचं असेल तर काडी काडी जमवून बघ,
जगणं सोपं आहे की मरणं सोपं आहे थोडं तोलून मापून बघ,
जीवन एक कोडं आहे जगता जगता ते सोडवून बघ
