STORYMIRROR

Nitin Borude

Abstract Inspirational

3  

Nitin Borude

Abstract Inspirational

संघर्ष...

संघर्ष...

1 min
132

परिस्थितीला सोबत

घेवून नाही जायचं मला

संघर्षाच्या वाटांनी

पुढे जायचं मला,..........


नको एक वेळचे अन्न

शिक्षण हवे आहे मला

स्वत:साठी नाही तर

आईवडिलां साठी काही तरी करायच मला,..............


जिद्दी ने शिक्षण करून

स्वप्न पूर्ण करणार मी

त्यांचा या कष्टांना 

उंच भरारी देईल मी ,..............


माझे प्रयत्न मी कधीच

नाही थांबवणार 

यशाची वाट मी 

संघर्षाने पार करणार,.........


जिद्द आहे मनी माझ्या 

काही तरी मोठे करणार 

त्या शिवाय माझा संघर्ष

मीच नाही थांबवणार,...............


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract