आयुष्याची जोडी
आयुष्याची जोडी
आयुष्याचा प्रत्येक क्षण
तुझ्यासोबत कायम असावा
संकट प्रसंगी एकमेकांत
मिसळून असणारा दिसावा
आयुष्याची सुरुवात करत
सुखी संसार सोबत घेऊन
मुला बाळांची भविष्याची
वाटचाल आयुष्यभर देऊन
आयुष्य खूप सुंदर तुझ्यासोबत
साथ तुझी हवी आयुष्यभराची
दोघांचा एकमेकांवर विश्वास
असावा तुझ्या माझ्या प्रेमाची
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
जीवनाची सुरवात आयुष्यभर
नात्याला दुरावा नसावा साथ
असावी तुझी माझी जन्मभर

