Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ajay Chavhan

Romance Others

3  

Ajay Chavhan

Romance Others

आयुष्याचे दिस चार....

आयुष्याचे दिस चार....

1 min
157


आयुष्याचे दिस चार

जगायचे सौख्य भरे ।

यावे माझ्या झोपडीत

माझे मन जिला स्मरे ।।


एक इच्छा अंतरीची

प्रेम तिने स्विकारावे ।

हात देऊनी हातात

प्रेमगीत सदा गावे ।।


तीच माझी स्वप्नपरी

मानलेली अर्धांगिनी ।

तीच आहे बनणार

माझी जीवन संगिनी ।।


प्रेम तिनेही करावे

मजवरी नित्य ऐसे ।

पहिल्याच पावसाची

चातकाला ओढ जैसे ।।


साथ तिची हवी आहे

नको मज अन्य काही ।

तिच्याविना जिने मज

देवा आता शक्य नाही ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance