STORYMIRROR

shital kendre

Romance Inspirational Others

4  

shital kendre

Romance Inspirational Others

आयुष्याचा रंगमंच

आयुष्याचा रंगमंच

1 min
9

सोंगाड्याच्या सोंगावर खळखळून हसतो,
हसता-हसता मात्र स्वतःलाच झाकतो…

तो रंग चढवतो चेहऱ्यावर क्षणापुरते,
आपण हसू पांघरतो वेदनांवर आयुष्यभराचे…

तो रंगमंचावर सोंग सहज मिरवतो,
आपण जगाच्या ओझ्यात रोज सोंग निभावतो…

तो टाळ्यांवर जगतो, टाळ्यांवर संपतो,
आपण नि:शब्द राहूनही सर्व काही सहन करतो…

आज आरशात पाहिलं, मन थोडं थांबलं,
खूप कौतुक वाटलं… म्हणून मनाशीच पुटपुटलं

 सोंगाड्याच्या सोंगापेक्षा आज मला,
माझंच सोंग… अधिक खोल, अधिक खरं,
आणि थोडंसं जास्तच भारी वाटलं.
           
                                         - शीतल शिवाजी केंद्रे 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance