आयुष्य
आयुष्य
संधी मिळेल तुलाही हिरमुसू नकोस
आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस
सूर्य रोजच उगवतो त्याच तेजाने
रोज मावळतीला जातो नेमाने
प्रेम तुझ्यावर करणारे लोक आहेत
तुझ्यासाठी जोडणारे खूप हात आहेत
अरे अशाच आपल्यांसाठी हसून बघ
आयुष्य खूप सुंदर आहे खचु नकोस
वाट तुझी बघत असतं रोजच कुणीतरी
तुझ्यासाठी जगात असतं आस लावून प्रत्येक क्षणी
उठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे
प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे
नाही नाही म्हणून उगाच कुढत तू बसू नकोस
आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस
विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस
आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस
