आयुष्य
आयुष्य
रडता-रडता मरण्यापेक्षा, लढता-लढता मरावं.
आयुष्य लाभते एकदा मनापासून जगावं.
जगावे तर असे, जणू दररोज जन्म नवा.
जगतांना मात्र मरणाचे स्मरण ठेवा.
आयुष्य कसं बघा बहारदार होईल.
आनंद, नवचैतन्य बहरून येईल.
चिंता नको उद्याची, ना दुःख भूतकाळाचे.
वर्तमानात गुंफावे नवे धागे आयुष्याचे.
