STORYMIRROR

Priti Gole

Others

3  

Priti Gole

Others

माहेर

माहेर

1 min
221

माझ्या पावलांचे ठसे सोडून आले.        

आई, आज मी माहेर सोडून आले.            


गलबला तो मैत्रिणींचा आज

अंगणात असणार नाही.  

तुझ्या हाकेला साद द्यायला

लेक तुझी असणार नाही. 


आठवणी माझ्या तुझ्या

हृदयात राहतील ना?   

लग्नाआधी करीत होती,

तेवढेच प्रेम करशील ना?


माहित आहे मला,

तुझे प्रेम कधी कमी होणार नाही.  

नाळ जोडली आहे तुझ्याशी,

ती कधी तुटणार नाही. 


किती गोड आठवणी माहेरच्या असतात अगं.      

तू सोडलं होतं तुझं माहेर तेव्हा, तुझंही मन रडलं होतं का गं?                            


आई आज परत लहानपण जगावंसं वाटतं.        

परत तुझ्या कुशीत निजावंसं वाटतं.             


बोलशील चार शब्द जरी,

आता नाही लागणार जिव्हारी.                                

आई तुझ्या लेकीला

कळली सगळी दुनियादारी. 


Rate this content
Log in