आयुष्य
आयुष्य
प्रत्येक वेळी यश पदरात पडेलच
अशी आशा मुळीच करू नका
अपयश जरी आल कधी तरी
स्वतःस खचून मात्र देऊ नका
थोड थांबा विश्रांती घ्या आणि
आपल काय चुकत आढावा घ्या
पुन्हा नवीन सुरुवात करा आणि
घडलेल्या चूकातून नवा धडा घ्या
हिच ती वेळ आहे सावरण्याची
नव्याने पुन्हा गोष्टी शिकण्याची
जगात शेवट फक्त मरणाला
जिद्द ठेवा पुन्हा पुन्हा लढण्याची
