STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Tragedy

3  

Mrs. Mangla Borkar

Tragedy

आयुष्य म्हणजे

आयुष्य म्हणजे

1 min
208

आयुष्य म्हणजे कटकट...


जगण्यासाठी रोज कामाच्या ओझ्याखाली मराव लागतं


सुखाचा मोती मिळवायला दु:खाच्या सागरात बुडावं लागतं


आयुष्य म्हणजे वणवा...


इथे वेदनांना घेउन जळावं लागत


पोटाच्या आगीसाठी वणवण पळावं लागतं


आयुष्य म्हणजे अंधार...


इथे काळोखात बुडाव लागतं


परस्परांच्या बुद्धीप्रकाशाने इच्छित स्थळ शोधाव लागतं


आयुष्य म्हणजे पाऊस...


आप्तांची रखरखता पुसण्यासाठी मुक्तपणे कोसळाव लागतं


कष्टांच्या खाच खळग्यातुन वाहत सुखसागराला


मिळाव लागतं


पण ...आयुष्य हे असेच का?


मला वाटते .. आयुष्य म्हणजे तान्हुल्याचे हास्य


जिथे स्वत:ही मुक्त कंठाने हसता येत.


आपण अनुभवताना दुसर्‍यालाही सुख देता येतं.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy