आयुष्य जगायचं असतं
आयुष्य जगायचं असतं
जे घडेल ते सहन करायचे असतं,
बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं
आयुष्य असंच जगायचं असतं
कुठून सुरु झालं हे माहीत नसलं तरी,
कुठंतरी थांबायचं असतं,
आयुष्य असंच जगायचं असतं
कुणासाठी काहीतरी निःस्वार्थपणे करायचं असतं,
स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचे असतं
आयुष्य असंच जगायचं असतं
दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं,
हसता नाही आलं तरी हसवायचं असतं,
आयुष्य असंच जगायचं असतं
पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं,
आकाशात झेपावूनही धरतीला विसरायचं नसतं,
आयुष्य असंच जगायचं असतं
मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला तरी
मागून मागून काय मागितलंस असंच म्हणायचं असतं,
आयुष्य असंच जगायचं असतं
इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं,
पण जग सोडताना मात्र समाधानानं जायचं असतं,
आयुष्य असंच जगायचं असतं...
