आवड बदली तर
आवड बदली तर
प्रेम आहे की नाही मी तीला विचारले नाही
या भीतीने की तिने मज नकार दिला तर.....
मी सध्या तिच्याशी काहीच बोलत नाही
बोलताने तिने जुन्या जखमा ताज्या केल्या तर....
प्रेम करतो तिच्यावर आजही फक्त सांगत नाही
चुकून माझ्याकडून तिचे मन दुखावले तर....
ती असता वर्गात मी ते लेक्चर करत नाही
लेक्चर मध्ये तीला पाहता परत प्रेम झाले तर
ठाऊक आहे मला ,मी तीला आवडत नाही
करतो प्रेम या आशेने तिची आवड बदली तर
मी तीला कधीच माझे आडनाव सांगत नाही
आडनाव एकूण तिने माझी जात विचारली तर
कवितेतून याच साठी मांडून ठेवतो प्रेम माझे
तीला सांगण्या आधी आयुष्याचा शेवट झाला तर....