STORYMIRROR

Jalindar Barbade

Others

4  

Jalindar Barbade

Others

माझ्याबद्दल

माझ्याबद्दल

1 min
590

मी कितीक सांगेल हो तुम्हाला माझ्याबद्दल,

तिला विचारा ती जास्त सांगेल माझ्याबद्दल


सगे सोयरे नेहमीच चांगलं सांगतील हो तुम्हाला,

कधी शत्रूला विचारा तोही तसंच सांगेल माझ्याबद्दल


जास्त हलक्यात घेऊ नका कुणीही वैर माझ्याशी,

एकदा पूर्ण माहिती काढून घ्या तुम्ही माझ्याबद्दल 


मी स्वत: तर कधीच काही लिहीत नाही, पण

ती खूप काही लिहिते म्हणे यार हो माझ्याबद्दल


जावई बनवण्याचा मला त्याचा डाव असावा,

काल खूपच खोलवर चौकशी केली एकाने माझ्याबद्दल


मी तर फक्त प्रेम कविता छंद म्हणून लिहितो,

मग का लोक इतका गैरसमज करून घेतात माझ्याबद्दल


आईने सांगितले तेव्हा कळले की मी कसा आहे,

नाहीतर मलाच काय कुणालाच शक्य नाही समजून घेणं माझ्याबद्दल


मी इतरांमध्ये कधीच दोष शोधत नाही, कारण

मी चांगलाच जाणून आहे माणूस म्हणून माझ्याबद्दल


Rate this content
Log in