STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Tragedy

3  

Sanjay Raghunath Sonawane

Tragedy

आठवण

आठवण

1 min
819


खाऊसाठी पैश्यांचा आम्ही हट्ट धरायचो

चार आण्यासाठी तासनतास रडायचो

दारिद्रयात उणीव भासे आम्हांला पैस्यांची

लहान वयात नव्हती कदर आई बापाच्या कष्टाची


आमच्या हट्टाने त्यांचे डोके फिरायचे

रडण्यापाई आईबाप आमचे रागवायचे

संसारासाठी चार आणे कमी पडायचे

मिळेल त्याच्यातच घर चालवायचे


उधारीवर जगायचे आवडत नसायचे

तुटपुंज्या मजूरीत तसेच सोसायचे

प्रत्येक सणाला गोडधोड दिसे दुसऱ्यांच्या घरी

त्यांचे उरलेले शिळे अन्न आमचे उदर भरी


शिळे अन्नही आम्ही खातअसे आवडीने

सण साजरा झाल्याचे सांगत होतो आनंदाने

निरक्षर आईबापाने दिले स्वच्छतेचे धडे

तुटपुंज्या पैस्यात कधी मोठे नव्हते फटाकडे


प्रदूषणही हटे आपोआप वायू प्रदूषण थांबायचे

हानिकारक वस्तुंचे लाड कधी पुरवत नसायचे

आईबाप आमचे कायम मजूरीने राबायचे

गरीबीतही तेच आमचे आधार असायचे


शिस्त, संस्काराचे धडे बालपणी मिळायचे

चांगले, वाईट अनुभव अंत काळजाने सांगायचे

कडक उन्हात आईबाप मजूरीने राबायचे

मातीकाम करून आमचे पोट भरवायचे


आम्ही त्यांच्या सोबत मदतीला राबायचो

कधी कधी सुट्टीच्या दिवशी मजूरीने जायचो

आमच्या पैस्यांचा त्यांना आधार करायचो

आनंदाने आईबापाच्या कुशीत झोपायचो


श्रीमंतीची नव्हती हाव आम्ही शांत झोपायचो

हापापलेल्या जगात आम्ही सुखाने जगायचो

कर्ज नको डोक्यावर सल्ला आईबापाचा

जगाशी नको बरोबरी ,साधेपणाने राहण्याचा


स्पर्धा नव्हती त्यांची कधी बदलत्या जगाशी

कठीण काळात राहत असे आम्ही उपाशी

गरीबीचे राखावे भान लई उतुमातू नये

दारी आली श्रीमंती मागचे दिवस विसरु नये


झटपट श्रीमंतीसाठी हाव हाव करू नये

कुणाही गरीबाला कधीच कमी लेखू नये

कर्ज काढून व्यसनाचे चोचले पुरवू नये

संसार सुखाचा उध्वस्त करू नये


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy