आठवण
आठवण
बेधुंद त्या क्षणांना घालीत साद आली
आरक्त भावनांचा लेवून साज गेली
जेव्हा सख्या रे तुझी आठवण मज आली
मी बेभान होऊन बघतच राहाले
सूर्य किरणा सवे तू आला
स्पर्शुन पापण्यांना सांगून काही गेला
प्रीतीच्या चांदण्याची बरसात आज झाली
जेव्हा सख्या तुझी रे आठवण मज आली
तुझ्याविना आता हृदयास चैन नाही
तोडू नकोस बंध विसरू नकोस काही
विश्वास ठेव सदैव साथ दे
नाते जप असे मोहक निरागस फुले जसे
अन् संपूर्ण आयुष्य जावो माझे तुझ्या सहवासात
फक्त एवढच आता मागणं सख्या तुला
तुझ्या प्रेमाशिवाय आता मला काही नको रे...

