आठवण बहिणीची
आठवण बहिणीची
आजही आठवता हसू उमटते
क्षणात मात्र काळीज चरचरते
हुंदका येतो दाटुनि जेंव्हा
वेड्या बहिणीची आठवण होते
नको नकोशी वाटणार्या बहिणीसाठी
तीळ तीळ काळीज तुटत
तिने केलेल्या प्रत्येक लाडाचे
चलचित्र सामोरी उभे राहत
कधी म्हणायचो किरकिर वाटते
तुझ्या बोलण्याचा त्रास होतो
आज मात्र बहिणीच्या आवाजसाठी
तीळ तीळ जीव तुटतो
आज ती मग्न कामात
मला तिची उणीव भासते
लहानपणी केलेल्या खोड्या सोबतच्या
आठवणीने डोळ्यात पाणी येते
लहानपणाच्या आठवनी आठवून नकळत
आज माझे डोळे पाणावले
स्मरुणी चेहऱ्यास तिच्या आजहि
माझा जीव हा गहिवरतो
