STORYMIRROR

vaishali vartak

Romance

3  

vaishali vartak

Romance

आठव भेट आपुली

आठव भेट आपुली

1 min
402

आठव ती भेट आपुली

चंद्र साक्षीत घडलेली

 घेऊनिया हात हाती

 वचने ती दिधलेली


स्मरतो तो गंध सुमनांचा

मंद हवेतला गारवा

धुंद रात्री दोन जीवांनी

गोड गायला मारवा


उमलेली गंधीत फूले ती

हसली पाहूनी अबोल प्रीत

कुजबुजली एकमेकात

अशी असते प्रेमाची रीत


आज आलो पुन्हा तेथेच

तोच चंद्र पहा हसला

आठवता ती मुग्ध रात्र

वृक्ष फुले उधळीत बहरला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance