आठोळी कविता
आठोळी कविता
गत जन्माची सय मनातली
ओझं होई का सल उन्हातली
छळ मांडला का असा संसारी
प्रश्न मनासी खंत ही उरातली
अनामिका ठरले या सांसारी
क्षणास ओळख ती नाकारली
विरुनी आज पुन्हा हसे सावली
स्मितात या अश्रुंची फुले हसली
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
आज जुन्या त्या वाटे वरती
पावले आपसुक बळावली
भेटली ती नव्याने मनातली
ओळखीची आपली सावली
काल भेटल्या सावली सोबती
क्षणिक धुकयाची आस होती
भेटली ती नव्याने त्या क्षणातली
आभासिक छबी माझीच होती
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
एक अनामिक ओढ अंतरी
चंद्र मनीचा खिळवुनी गेली
अजुनीही गुंतली जी नजर
भाव मनीचा सांगूनी गेली
केविलवाणी चकोर खुली ती
चांदनीस राग देवुनी गेली
नभी उगवता चंद्र्कोर ती
घाव हृदयी घालूनी गेली

