STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Action Inspirational Thriller

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Action Inspirational Thriller

आत्मविश्वास

आत्मविश्वास

1 min
163

मी तमाने कोंडलेला श्वास नाही 

सूर्य आहे मी कुणाचा दास नाही 


टोळगोटे फोडले मी काळजाने 

घेतला लावून कधी फास नाही 


आरशावर प्रेम आहे खूप माझे 

तोडला त्याचा कधी विश्वास नाही 


खेळतांना हारलो मी लाख वेळा

जिंकण्याची सोडली मी आस नाही 


वादळांची अन तुफानांची कथा मी

गोष्ट माझी प्रेमळ उपन्यास नाही 


मी उन्हाचा पेटलेला जाळ आहे 

श्रावणाच्या पावसाचा मास नाही 


संकटांशी मी लढाया सज्ज झालो

मलमपट्टी बांधली घावास नाही 


आसवांच्या सागरांचा नाखवा मी

मी सुखाच्या कल्पनांचा भास नाही 


जीवनाशी युद्ध माझे रंगलेले

वेदनांना टाकला मी घास नाही  



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action