आता मी न उरलो
आता मी न उरलो
तुझ्या आठवांना
मनात भरूनी,
तुझियाच साठी
मी रडलो कितीदा,
तुझी आर्जवे मी
तुझ्याचपाशी केली,
तुझियाच साठी
मी झुरलो कितीदा,
उरला होता जो
एक श्वास माझा,
देऊन तुला मी
तुझा जीव झालो
मानून बसलो
तुला सर्वकाही,
माझ्यात माझा
आता मी न उरलो

