STORYMIRROR

Nalini Laware

Classics Others

4  

Nalini Laware

Classics Others

#आशा

#आशा

1 min
298

दिवस गेला मावळतीला

आशा मनी ठेवून

उजळतील दिशा सूर्यकिरणांनी

स्वप्न उरी बाळगून

नवी आशा स्वप्न तीच

उम्मीद जागी होई

 प्रयत्नांची लावून दोरी

झेपावण्या सज्ज राही

उगवू दे प्रत्येक दिवस

 वर्ष संपले तरीही

स्वागत करुनी नव्याने

साजरा जसा उत्सवही 

प्रेम देऊन प्रेम घेऊ

वाटू मुक्तहस्ते आनंदाला

सुखाचा करू सागर

पळवून लावू दुःखाला.


प्रा. सौ नलिनी लावरे 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics